अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर तहसील पथकाची कारवाई

Foto
वाहन सोडण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा दबाव

पैठण, (प्रतिनिधी) : आयटीआय परिसरात अवैध वाळूचे उत्खनन करून ती वाहनात वाळू भरून जात असताना तहसीलच्या पथकाने गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन सदरील वाहन थांबवले असता वाहन चालक चावी घेऊन पळून गेला. :
त्यामुळे या पथकाला जवळपास तीन ते चार तास गोदावरी नदीच्या पात्रात तळ ठोकून बसावे लागले. आयटीआयच्या परिसरातअवैध वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळतात पैठणच्या मंडळ अधिकारी कल्पना शेळके, पैठणच्या ग्राम महसूल अधिकारी शितल झिरपे, हादगाव चे ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत गोजरे व कावसानचे ग्राम महसूल अधिकारी सुधाकर निकम आदींनी गोदावरी पात्रात धाव घेतली असता या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून क्रमांकाच्या -२८ - ९२४८ वाहनांमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. 

पथकाला पाहताच वाहन चालकाने गाडीची चावी घेऊन पळ काढला. ही कारवाई सुरू असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर जमा झाले होते व सदरील वाहन सोडण्यास जबाब टाकत होते. जमाव जमत असल्याचे पाहताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा या पथकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : 
सदरील वाहनावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये व वाहन सोडून देण्यात यावे यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी या पथकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु हे पथक कोणाच्याही दाबाला बळी न पडता त्यांनीही कारवाई केली. सदरील वाहन हे नगरसेविकाच्या पतीची असल्याची माहिती मिळते.